महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sambhajinagar Riot Case : संभाजीनगरमधील दंगलीवरून फडणवीस-पटोलेंमध्ये कलगी तुरा - त्यांना न्यायालययीन कारवाई समजत नाही

संभाजीनगर येथे घडलेली घटना दुर्दैवी घटना आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेते जाणीवपूर्वक वाद वाढावे यासाठी भडकवणारे वक्तव्य करीत परिस्थिती बिघडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. नेत्यांनी अशा वेळेस कसे वागले पाहिजे याची काळजी घ्यावी. शहर शांत ठेवणे ही प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यावर काँग्रेस नेते पटोले यांनी लगेच पलटवार केला.

Sambhajinagar Riot Case
संभाजीनगरमधील दंगलप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला

By

Published : Mar 30, 2023, 3:40 PM IST

Updated : Mar 30, 2023, 5:19 PM IST

संभाजीनगरमधील दंगलीवरून फडणवीस-पटोलेंमध्ये कलगी तुरा

नागपूर : संभाजीनगरात कायदा सुव्यवस्था बिघडावी यासाठी काही नेते स्वार्थासाठी स्टेटमेंट करीत आहेत, त्यांनी तसे करू नये. याला कोणी राजकीय रंग देत असेल, तर त्यापेक्षा दुर्दैवी काही नाही. काही नेते स्वार्थासाठी अशी राजकीय वक्तव्ये करीत आहेत, असे वक्तव्य छोट्या बुद्धीने, राजकीय बुद्धीने प्रेरित होऊन केलेली वक्तव्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाचेही नाव न घेता नेत्यांवर पलटवार केला. ते नागपुरात बोलत होते. या क्षणी संभाजीनगरमध्ये शांतता आहे. ही शांतता राहावी यासाठी सर्वांना प्रयत्न करावा लागेल.

त्यांना न्यायालययीन कारवाई समजत नाही :सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही निरीक्षण नोंदवले नाही. महाराष्ट्र सरकार विरोधात Contempt सुरू केलेले नाही. एक जनरल स्टेटमेंट केलेले आहे. सर्व राज्य सरकारांनी काय केले पाहिजे, असे न्यायालय बोलले आहे. जे याबद्दल बोलत आहे माझे त्यांच्याबद्दल म्हणणे आहे की, त्यांना न्यायालयीन कारवाई फारशी समजत नाही.

भाजपने पेरलेले हे विष आहे : संपूर्ण देशात रामनवमीचा उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होत असताना संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. भाजपने पेरलेले हे विष आहे, दोन धर्म आणि जातीत फूट पाडून इंग्रजांप्रमाणे भाजप पुढे जात आहे. दंगल झाल्यामुळे शहराचे आणि आपल्या राज्याचे नुकसान होते. बीजेपीने टाकलेल्या विषावर आपण जाऊ नये, असेही नानांनी जनतेला आवाहन केले आहे.

न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे :न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हे सत्तेत बसलेले लोक हिंदू सभेच्या नावावर मोर्चा काढायचे आणि दुसऱ्या धर्माला दोष द्यायचे, त्याबद्दल काय वाट्टेल ते बोलायचे. त्यामध्ये भाजपचे मंत्री आमदार असतात. सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. या पद्धतीचे जे वातावरण निर्माण होत आहे. ते अत्यंत घातक आहे.

हेही वाचा : Kirit Somaiya News: संजय राऊतांसह पवार आणि ठाकरेंना अपेक्षित ती ही तीच दंगल आहे का? - किरीट सोमैय्यांचा सवाल

Last Updated : Mar 30, 2023, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details