महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले - नागपूर

मार्गवर येणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत एका २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

नागपुरात भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले

By

Published : May 7, 2019, 9:00 PM IST

नागपूर- कामठी मार्गवर येणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत एका २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही तरुणी कन्हानवरुन नागपूरला येत असताना हा अपघात झाला. अर्पिता बोरकर असे अपघातमध्ये मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

ही तरुणी आयसीआय बँक नागपूर येथे सेल्स एक्झुक्युटपदी कार्यरत होती. ती नेहमीप्रमाणे ऑफिसला जात असताना भिलगाव चुंगी नाका क्रमांक २ वर हा अपघात झाला.

ट्रक नियमित सर्व्हिसिंगसाठी खैरीवरून नागपुरच्या दिशेने येत होता. त्यावेळी अर्पिताच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या धडकेत अर्पिताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसातील अपघाताची ही दुसरी घटना असून २३ एप्रिलला देखील वाडी परिसरात एका तरुणीला ट्रकने चिरडले होते. शहरालगत असलेल्या बाह्य भागात भरधाव ट्रकची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे या भागात अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details