नागपूर - शरहारातील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बबलू शंभू यादव असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. सकाळी अंघोळ करताना त्यांचा पाय घसरल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथे दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा मृत्यू... - नागपूर न्यूज
शरहारातील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बबलू शंभू यादव असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. सकाळी अंघोळ करताना त्यांचा पाय घसरल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती.
बबलू शंभू यादव हे ठाणे येथील रहिवासी होते. बलात्काराच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली होती. १० जून २०१८ रोजी बबलू यादव यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आज सकाळी अंघोळीदरम्यान हौदावर पाय घसरून पडल्याने या कैद्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर शासकीय मेडिकल रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.
उपचारदारम्यान त्याचा मृत्यू झाला. नियमानुसार मृत्यू झालेल्या कैद्याची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.