नागपूर- आज संपूर्ण जगात जागतिक सायकल दिन साजरा होत आहे. यानिमित्त आज सकाळी शहरात सायकल रेसचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील लॉ कॉलेज चौकातून या सायकल रेसची सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहरातील बहुसंख्य सायकल प्रेमी सहभागी झाले होते. या माध्यमातून सायकलस्वारांनी नागपुरातील विविध भागातून पुढे जात नागरिकांना सायकल चालवा, आरोग्य उत्तम ठेवा असा संदेश दिला.
याशिवाय नागरिकांमध्ये सायकलिंगचा प्रचार-प्रसार करणे. त्याच बरोबर सायकलचा वापर करून पर्यावरण रक्षण करण्याच्या हेतूने सर्वांनी सायकलचा वापर करावे, असे आवाहनही सायकल प्रेमींनी नागपूरकरांना केले. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सर्वांनी आजपासूनच सायकलचा वापर करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. शहरातील सुज्ञ नागरिकांनी केलेल्या जनजागृतीमूळे गेल्या काही काळात सायकल चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे.