नागपूरात मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांमध्ये प्रचंड उत्सूकता - नागपूर
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग होतो आहे. त्यामुळे सर्व मतदारांना व्हीव्हीपॅट संदर्भात उत्सूकता आहे.
नागपूरात मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांमध्ये प्रचंड उत्सूकता
नागपूर - पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग होतो आहे. त्यामुळे सर्व मतदारांना व्हीव्हीपॅट संदर्भात उत्सूकता होती. या विषयी मतदारांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधि धनंजय टीपले यांनी.