नागपूर - कुख्यात गुन्हेगार किशोर उर्फ बाल्या बिनेकरचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. फिल्मी स्टाईलने बाल्या बिनेकर असलेल्या कारचा दुचाकीने पाठलाग करत सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोले पेट्रोलपंप चौकावर हल्लेखोरांनी बाल्याची हत्या केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील घरापासून केवळ एक किमी अंतरावर ही घटना घडली आहे.
नागपुरात कुख्यात गुंडाचा भर रस्त्यात खून; घटना सीसीटीव्हीत कैद - नागपूर बाल्याचा खून बातमी
कुख्यात गुंड किशोर ऊर्फ बाल्या बिनेकरचा भर रस्त्यावर खून करण्यात आला. बाल्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता हे गँगवार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपींनी बाल्यावर चाकू, कुऱ्हाडीने वार करून खून केला. हा संपूर्ण प्रकार भर रस्त्यात घडला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. बाल्या हा सावजी भोजनालयासह जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, बाल्या बिनेकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता हे गँगवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
हेही वाचा -शहरात कडक उकाड्यानंतर मुसळधार; वातावरणात पसरला गारवा