नागपूर - कोरोनाची तिसरी लाट येणार आणि त्याचा संभाव्य धोका हा लहान मुलांना राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. यासाठी 2 ते 18 वयोगटातील बालकांसाठी आद्यप लस उपलब्ध नाही. यासाठी मानवी चाचणीला भारतीय औषध महानियंत्रकाकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे यात देशातील तीन रुग्णलायत ही चाचणी होणार आहे. यामध्ये उपराजधानी नागपूरसुद्धा समावेश आहे.
दोन महिन्यांपूर्वी मागीतली होती परवानगी -
कोरोना लसीच्या मानवी चाचणीला (ट्रायल) मंजुरीसाठी मागील दोन महिन्यांपासून परवानगी मागण्यात आली होती. पण तिसऱ्या लाटेचा धोका पुढे पाहता अखेर परवानगी मिळाल्याने सुखद बातमी पुढे येत आहे. दिल्ली, पाटणा आणि नागपूरात मेडिट्रीना या रुग्णलायत ही ट्रायल होणार असून वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्याकडे मानवी ट्रायल घेतली जाणार आहे.