महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 3, 2020, 4:36 PM IST

ETV Bharat / state

उपराजधानीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, सहाशेचा टप्पा पूर्ण

गेल्या 5 दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. तर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 67 इतकी झाली आहे.

Indira Gandhi hospital nagpur
Indira Gandhi hospital nagpur

नागपूर - सकाळच्या सत्रात 17 संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 600 इतकी झाली आहे. 84 दिवसांच्या कालावधीत एवढी रुग्णसंख्या झाली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, 500 रुग्ण संख्या होण्यासाठी 79 दिवस लागले होते, तर केवळ 5 दिवसांत 100 रुग्ण वाढल्याने आता हा आकडा 600 झाला आहे. 11 मार्च रोजी शहरात पहिला रुग्ण हा आढळून आला होता. तेव्हापासून सुरू झालेली कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अजूनही यश आलेले नाही.

तर, दुसरीकडे कोरोनाच्याबाबतीत नागपूर शहर हे भारतात सर्वाधिक रिकव्हरी रेट असलेले शहर असून गेल्या 5 दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. तर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 67 इतकी झाली आहे. आता नागपुरातून 404 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. पुढील काही दिवस नागपुरातील रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details