नागपूर- शहरात कोरोना रुग्णांची संख्या 14वर पोहचली आहे, तर चार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 10ने वाढली आहे. यामध्ये एका अकरा वर्षीय मुलीचा समावेश झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयात दहा रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Coronavirus: नागपुरकरांची चिंता वाढली... रुग्णांची संख्या 14वर! - Nagpur
नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या 14वर पोहोचली आहे. 4 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 10 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना वायरसचा सामना करण्यासाठी भारतात युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. नागपुरात शंभर टक्के लॉकडाऊन पाळले जात असताना गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दहाने वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं या रुग्णाला संसर्ग झाला आहे.
दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 18 व्यक्तींची शुक्रवारी तपासणी केली होती. त्यातील 17 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.