नागपूर - नागपूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट राहिला आहे. मात्र दरम्यानच्या काळात कोरोनाची रुग्णससंख्या जिल्ह्यात घटली आहे. पण मागील तीन चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीडशे वरून पाचशेच्या घरात वाढली आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. ते बचत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यात वाढणारी रुग्ण संख्या ही जरी शहरातील काही भागातून वाढताना दिसत आहे. पण ग्रामीण भागात प्रमाण अद्याप वाढले नसल्याचे दिसून येत आहे. यात पण शहरालगतच्या ग्रामीण भागातून ये-जा करणारा मोठा वर्ग आहे. यामुळे संभाव्य धोका टाळला जावा यासाठी महत्वाचे उपाययोजना राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले. यात ग्रामीण भागात होणारी कोरोना चाचणीची संख्या ही 700 च्या घरात आहे. यात वाढ केली जाणार असून ही संख्या आता 1,500 चाचण्या प्रतिदिनपर्यंत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सुद्धा लक्षणे असल्यास दुर्लक्ष न करता लगतच्या पीएससी केंद्रात जाऊन मोफत कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दुर्लक्ष केल्यास भविष्यातील धोका टाळला जावा किंवा प्रकृती गंभीर होण्याऐवजी योग्यवेळी आरोग्य तपासणी करून घेण्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले. यासह महत्त्वाची बाब म्हणजे सध्या 80 टक्के कोरोनाच्या चाचण्या या आरटीपीसीआरच्या माध्यमातून केल्या जात आहेत. तेच 20 टक्के चाचण्या या अँटिजेन पद्धतीचा अवलंब करत केल्या जात आहेत.
शहरातील 'या' भागात आहे रुग्णसंख्या वाढली -
यात ही संख्या शहरातील काही भागात ज्यामध्ये खामला, स्वावलंबी नगर, जयताळा, आयोध्यानगर, न्यू बिडी पेठ, वाठोडा, दिघोरी, जरिपटका, जाफर नगर आदी भागांमध्ये रुग्ण संख्या जास्त असल्याचे पुढे आले आहे. हा धोका ग्रामीण भागात अद्याप नसला तरी मोठ्या प्रमाणात शहरात लोक ग्रामीण भागातून ये-जा करत असतात. यामुळे याचा संसर्ग हा ग्रामीण भागात पसरू नये, धोका टाळण्यासाठी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
शहरालगत ग्रामीण भागात रुग्णसंख्या ही अधिकच -
कोरोनाची रुग्णसंख्या शहरा लगतच्या ग्रामीण भागातील नागपूर ग्रामीण, कामठी, हिंगणा सावनेरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे प्रमाण अधिक आहे.
टक्केवारीत वाढलेली रुग्णसंख्या -