नागपूर -कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्याचे नवे धोरण केंद्र सरकारने ९ मे रोजी जाहीर केले आहे. मात्र, नागपूर विभागात प्रशासनाने नव्या धोरणाचे आदेश जारी न केल्याने रुग्णांना सध्याच सुट्टी मिळणार नसल्याची माहिती आहे. ज्यामुळे सरकारच्या नव्या धोरणाच्या नियमात बसणाऱ्या अशा सुमारे दीडशे रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्यासाठी आधीच्याच निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
नागपुरात कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देताना जुन्याच निर्देशाचे पालन, अद्याप नवे आदेश नाहीत - नागपूर कोरोना अपडेट
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी १४ दिवस रुग्णालयात ठेवले जाते. कोरोनाची लक्षणे नसली तरी १४ व्या दिवशी २४ तासांच्या अंतराने त्यांची कोरोना चाचणी करून दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते. परंतु, आता कोव्हीड रुग्णांसाठी सुधारित धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी १४ दिवस रुग्णालयात ठेवले जाते. कोरोनाची लक्षणे नसली तरी १४ व्या दिवशी २४ तासांच्या अंतराने त्यांची कोरोना चाचणी करून दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते. परंतु, आता कोव्हीड रुग्णांसाठी सुधारित धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या मार्गदर्शक धोरणानुसार, सौम्य, अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना सात ते नवव्या दिवसापर्यंत ताप आला नसेल तर दहाव्या दिवशी अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात यावा. सुट्टी देताना कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचेही म्हटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना १४ दिवसांऐवजी पुढील सात दिवसच घरी विलगीकरणात राहावे लागणार आहे. नागपूरच्या मेयो व मेडिकल रुग्णालयात असे सुमारे दीडशेच्यावर रुग्ण आहेत ज्यांना लक्षणेच नाहीत. शिवाय त्यांचा ९ दिवसांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. परंतु, केंद्र सरकाराच्या नव्या मार्गदर्शक सूचनांविषयी नागपूर विभागातून कुठलेही नवे निर्देश जारी न केल्याने नागपुरात सध्या जुन्याच निर्देशानुसार कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.