नागपूर - शहरातील प्रसिद्ध महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांचा उकाड्यापासून बचाव व्हावा यासाठी कुलर बसवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ६ कुलर लावण्यात आले होते. त्यापैकी ४ कुलर बिबट्यांच्या खोली बाहेर लावण्यात आले आहेत.
महाराजबाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी कुलरची व्यवस्था - महाराजबाग प्राणी संग्रहालय
दिवसेंदिवस विदर्भाचे तापमान वाढतच आहे. सध्या नागपूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने सामान्य माणसाला घराबाहेर पडणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मुक्या प्राण्यांची काय अवस्था असेल? याचा विचारही न केलेला बरा. त्यामुळे महाराज बाग प्राणी संग्रहालयाने प्राण्यांना उकाळ्यापासून वाचवण्यासाठी जागो-जागी कुलर लावले आहेत.

कडाक्याच्या उन्हाने होरपळत असलेल्या विदर्भातील जनतेला काही अंशी या उन्हाची सवय झाली आहे. मात्र, प्राण्यांकरिता हा भीषण उन्हाळा जड जात असतो. त्यामुळे सध्या ५ ते ६ कुलर लावण्यात आले आहेत. त्यापैकी ४ कुलर हे बिबट्यांच्या खोलीबाहेर लावले आहेत, तर २ कुलर हे अन्य ठिकाणी लावण्यात आले. एवढेच नाही तर वाघाच्या पिंजऱ्यातही पाण्याचे मोठे टाके तयार करण्यात आले. वेळोवेळी या प्राण्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. पुढच्या महिन्यात नागपूरसह विदर्भाचे वाढण्याची शक्यता असल्याने महाराजबाग प्रशासनाला आणखी कुलर लावण्याची गरज भासणार आहे.