नागपूर -काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांनी गुरुवारी शिवतिर्थावर मंत्रिपदाची शपथ घेतली. आघाडी सरकारच्या काळात देखील त्यांनी रोहयो मंत्री म्हणून काम केले आहे. विदर्भातील नेता म्हणून काँग्रेसने त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.
विदर्भाच्या नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी, 'अशी' आहे नितीन राऊतांची राजकीय कारकीर्द - नितीन राऊतांची मंत्रीमंडळात वर्णी
डॉ. नितीन राऊत काँग्रेसचा विदर्भातील दलित चेहरा म्हणून ओळखला जातो. ते ५७ वर्षाचे असून त्यांचे शिक्षण एम. ए. पीएचडीपर्यंत झाले आहे. ते उत्तर नागपूर मतदारसंघातून तब्बल ४ वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. ते पहिल्यांदा १९९९ ला निवडून आले होते.
डॉ. नितीन राऊत काँग्रेसचा विदर्भातील दलित चेहरा म्हणून ओळखला जातो. ते ५७ वर्षाचे असून त्यांचे शिक्षण एम. ए. पीएचडी पर्यंत झाले आहे. ते उत्तर नागपूर मतदारसंघातून तब्बल ४ वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. पहिल्यांदा १९९९ ला निवडून आले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ साली सुद्धा ते निवडून आले. त्यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री म्हणून देखील काम केले आहे.
मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर नितीन राऊत यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच ते काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.