नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आत्मविश्वास आणि कृतीच्या बळावर कोरोनाच्या संकट काळातून बाहेर पडू शकतो, असा संदेश प्रधानमंत्री मोदींनी दिला आहे. तसेच, लघू, सूक्ष्म, मध्य, कुटीर आणि ग्रामोद्योगाला जे बळ प्रधानमंत्र्यांनी दिले आहे, ते कधीही न विसरण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संकट काळातून आत्मविश्वास व कृतीतून बाहेर पडू शकतो : नितीन गडकरी - जागतिक आरोग्य आणीबाणी
प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेज मुळे सूक्ष्म, मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या ११ कोटी कामगारांना मदत मिळणार आहे. हे उद्योग टिकून भविष्यात चांगले कार्य केले जाणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत २९ टक्के वाटा असणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांचा भविष्यात वाटा आणखी वाढेल असाही विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी
प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेज मुळे सूक्ष्म, मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या ११ कोटी कामगारांना मदत मिळणार आहे. हे उद्योग टिकून भविष्यात चांगले कार्य केले जाणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत २९ टक्के वाटा असणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांचा भविष्यात वाटा आणखी वाढेल असाही विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
Last Updated : May 13, 2020, 9:58 AM IST