नागपूरकाँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis आणि ब्राम्हण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे Complaint application against MP Balu Dhanorkar . पोलिसांनी खासदार धानोरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
जाती-जातीमध्ये तेढ निर्माण 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी एका सभेत बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते Balu Dhanorkar statement against Brahmin community . त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. खासदार बाळू धानोरकर यांच्या निषेधार्थ पोस्टरबाजी करण्यात आली.