महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज

राज्यातील सगळ्यात हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ ओळखला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असल्याने राज्यातील सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. येत्या 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत नागपूरच्या इतर ५ मतदारसंघाचे पाचही भाजप उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत.

विधानसभा निवडणूक 2019 : 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री करणार उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Oct 1, 2019, 12:42 PM IST

नागूपर -विधानसभेचे वारे संपूर्ण राज्यात वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 4 ऑक्टोबरला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इतर नेते उपस्थित राहणार असल्याचे माहिती मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख संदिप जोशी यांनी सांगितले. तर शहरातील महिला आघाडी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूक 2019 : 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री करणार उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा -महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू

राज्यातील सगळ्यात हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ ओळखला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असल्याने राज्यातील सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. येत्या 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत नागपूरच्या इतर ५ मतदारसंघाचे पाचही भाजप उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. शहरातील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details