नागपूर- लग्नासाठी खोटी माहिती देऊन लग्न केले, त्यानंतर विवाहितेला विदेशात नेऊन तिचे दागिने हडप केले आणि नंतर मोबाईलवरून तलाक...तलाक..तलाक असा संदेश पाठवून काडीमोड केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची तक्रार मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऑस्ट्रेलियन नागरिकाने नागपूरच्या तरुणीशी रचलं लग्न, बिंग फुटल्यानंतर ३५ लाखांचे दागिने केले लंपास
ऑस्ट्रेलिया देशाचे नागरिकत्व असलेल्या एका व्यक्तीने भारतीय असल्याचा खोटा भ्रम निर्माण करून दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीवर असल्याचे प्रोफाइल एका 'मेट्रिमोनिअल साईट'वर अपलोड केला. त्याच्या आकर्षक प्रोफाइलला भुलून नागपूरची एक तरुणी त्याच्या जाळ्यात अडकली.
ऑस्ट्रेलिया देशाचे नागरिकत्व असलेल्या एका व्यक्तीने भारतीय असल्याचा खोटा भ्रम निर्माण करून दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीवर असल्याचे प्रोफाइल एका 'मेट्रिमोनिअल साईट'वर अपलोड केला. त्याच्या आकर्षक प्रोफाइलला भुलून नागपूरची एक तरुणी त्याच्या जाळ्यात अडकली. त्यानंतर आरोपीने त्या तरणी सोबत थाटात लग्न देखील उरकवलं, मात्र ज्या वेळी तो आरोपी तिला घेऊन दुबई आणि कतारला घेऊन गेला तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर आरोपीने त्या तरुणीचे सर्व दागिने हडप केले आणि त्यानंतर मात्र मोबाईलवर तलाक...तलाक..तलाक असा संदेश पाठवून काडीमोड केला आहे. या प्रकरणाची तक्रार मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या फसवणूक प्रकरणातील आरोपी हुसेन काखडची हा ऑस्ट्रेलिया देशाचा नागरिक आहे. मात्र त्याने आपण भारतीय नागरिक असल्याचं खोटं सांगत नागपुरातील युवती सोबत मेट्रिमोनिअल साईट वरून ओळख केली,तिला आपल्या आश्वासक वाटणाऱ्या भूल-थापा मध्ये अडकवून तिच्या सोबत लग्न सुद्धा केलं. दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीवर असल्याचे सांगून तो तिला घेऊन तिथे गेला सुद्धा मात्र तिथे गेल्यानंतर आरोपीचे बिंग फुटले आहे. आरोपी हा ऑस्ट्रेलियन नागरिक असून त्याचे तिथे लग्न देखील झालेलं आहे. पीडित तरुणी दुबईला गेल्यानंतर आरोपी हुसेन काखडची याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरवात केली होती,त्याला वैतागुन ती भारतात परतली तेव्हा आरोपीने तिच्या मोबाईल वर मॅसेज करून घटस्फोट दिला आहे. आरोपी पीडिते जवळ असलेले लाखो रुपयांचे दागिने सुद्धा काढुन घेतले आहे. पीडिता नागपूरला आल्यानंतर सर्व घटनाक्रम कुटुंबियांना सांगितला, त्यानंतर आरोपी हुसेन काखडची सह पाच आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे