नागपूर - लॉकडाऊनमुळे कापसासह अन्य धान्य खरेदी केंद्रे बंद आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने हमीभावाने कापूस खरेदी केंद्र तसेच अन्य धान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
धानासाठी जाहीर केलेला ७०० रुपये प्रती क्विंटल बोनस तत्काळ द्यावा - चंद्रशेखर बावनकुळे - chandrshekhr bavankule
लॉकडाऊनमुळे कापसासह अन्य धान्य खरेदी केंद्रे बंद आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने हमीभावाने कापूस खरेदी केंद्र तसेच अन्य धान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
धानाला ७०० रुपये प्रती क्विटंल बोनस जाहीर झालेला आहे. ती रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी. हरभररा खरेदी 4 हजार 875 रुपये या हमीभावाने ताबडतोब करावी अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्याचबरोबर हरभरा विक्रीसाठी तयार असून तो शेतकऱ्यांच्या घरात साठवण्याच्या आला आह. मात्र, खरेदी केंद्रे अद्याप सुरू झाली नसल्यामुळे शेतकरी हरभरा विकू शकत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल व त्यांची आर्थिक अडचणीतून सुटका होईल, असे नियोजन सरकारने केल्यास खरीप हंगामात तो पैसा कामी येईल. त्यामुळे सरकारने लगबगीने पावलं उचलावीत अशी मागणी बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.