नागपूर -जिल्ह्यातील बुटीबोरी रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनचा एक डब्बा रुळावरून खाली उतरल्याची घटना घडली आहे. सिकंदराबाद-रकसोल (गाडी क्र. 07091) नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या अपघातामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
सिकंदराबाद-रक्सोल रेल्वेचा डब्बा रुळावरून घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - नागपूर
सिकंदराबाद-रक्सोल रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे अजनी इंटरसीटी, विदर्भ, पुणे-नागपूर, आझाद, मुंबई मेलसह अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या अपघातामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
सिकंदराबाद-रकसोल रेल्वेचा डब्बा रुळावरून घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
हेही वाचा -Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागपूरमध्ये जमावबंदी लागू
सिकंदराबाद-रक्सोल रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे अजनी इंटरसिटी, विदर्भ, पुणे-नागपूर, आझाद, मुंबई मेलसह अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आहे. गाडीचा वेग कमी असल्यामुळे या अपघातात प्रवाशी बचावले. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील तासाभरात वाहतूक सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.