नागपूर - ५९ मिनीटांत कर्ज मंजुर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. ५९ मिनीटांत बँक कर्ज मंजूर करते, मात्र कर्जाचे वितरण करायला बँक महिनोन महिने लावते. याकडे बँकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. इंडियन बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात गडकरींनी अधिकाऱ्यांचेच कान टोचले आहे.
५९ मिनीटांत कर्ज मंजुर होते हे सत्य; मात्र, त्या कर्जाचे वीतरण महिनोन महिने होत नाही हे पूर्ण सत्य - नितीन गडकरी
"गेल्या पाच वर्षात देशाच्या ६.५% जीडीपी मध्ये ३% योगदान माझी जबाबदारी असलेल्या विभागाने दिले आहे." असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते म्हणाले, ५ वर्षात १७ लाख कोटींचे विकास कामे करून अर्थव्यवस्था बळकट करु शकलो. तसेच पुढील ५ वर्षात २५ लाख कोटींचे कामे करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी नागपुरमध्ये इंडियन बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.

बँकांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज वितरण करण्याच्या त्यांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला गडकरींनी दिला. पंतप्रधानांनी या श्रेणीतील उद्योगांना ५९ मिनिटात कर्ज वितरण करण्याचे लक्ष दिले आहे. बँका अशा उद्योजकांचे कर्ज ५९ मिनिटात मंजूर तर करते. मात्र, त्याचे प्रत्यक्ष वितरण करण्यासाठी भरपूर कालावधी घेते. बँकांनी त्यांच्या दिरंगाई धोरणामध्ये बदल करावे अशा सूचना गडकरी यांनी केली.