नागपूर- शहरात कारमधून गोवंश चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंश चोरीच्या काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. त्याच्या आधारे पोलिसांनी या टोळीला गजाआड केले आहे. तब्बल 3 महिन्यांपासून या टोळीने नागपुरातील जयताळा, भांगे लेआऊट, वाडी, वाठोडा, पारडी, कामठी या भागातून गोवंशाची चोरी आहे.
कारमधून गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड - नागपूर गुन्हे बातमी
गोवंश चोरीच्या काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. त्याच्या आधारे पोलिसांनी या टोळीला गजाआड केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 1 जण फरार आहे.
गोवंश चोरीच्या संदर्भांत अनेक तक्रारी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. तेव्हा एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले, त्या आधारे पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे. हे चोर दिवसा दुचाकीने फिरून कोणत्या ठिकाणी गोपालक त्यांच्या गायी बांधतात याची रेकी करायचे. त्यानंतर पहाटेच्या सुमारास कार नेऊन गाय, त्यांचे बछडे चोरायचे. चोरलेले गोवंश पळवण्यासाठी ही टोळी कारच्या मागील बाजूची सीट काढून तिथे गाईंना क्रूर पद्धतीने कोंबत असत.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2018 मध्येही नागपुरातील बिडगाव, भांडेवाडी, पुनापूर, भरतवाडा या सीमावर्ती भागात अशाच गाई चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.