महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचे नागपुरात भव्य स्वागत - काँग्रेस

कॅबिनेटमंत्री डॉ. नितीन राऊत हे शपथविधीनंतर पहिल्यांदाच स्वगृही म्हणजेच नागपुरात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Cabinet Minister Nitin Raut
मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे स्वागत करताना

By

Published : Dec 2, 2019, 4:07 PM IST

Updated : Dec 2, 2019, 7:38 PM IST

नागपूर- महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झालेले नितीन राऊत यांचे स्वगृही नागपूरमध्ये आगमन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शेकडोंच्या संख्येने आलेल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न नितीन राऊत यांनी केला.

मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे स्वागत करताना

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागल्यानंतर आज पहिल्यांदाच डॉ. नितीन राऊत हे नागपूरला आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. राऊत हे विमानतळावर पोहचताच त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नितीन राऊत दीक्षाभूमीच्या दिशेने रवाना झाले.

हेही वाचा - विदर्भाच्या नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी, 'अशी' आहे नितीन राऊतांची राजकीय कारकीर्द

Last Updated : Dec 2, 2019, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details