महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामटेकची जागा शिवसेनेला गेल्याने भाजप कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग - bjp

जवळपास ९० हजार कार्यकर्त्यांची बांधणी केल्याचा भाजपचा दावा आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची सर्व तयारी भाजपकडून करण्यात आली होती.

भाजप नेता

By

Published : Mar 14, 2019, 1:02 PM IST

नागपूर - गेल्या चार वर्षात भारतीय जनता पक्षाने रामटेक लोकसभा मतदारसंघात चांगलीच ताकद वाढवली होती. युतीची शक्यता नसल्याने भाजप कार्यकर्ते या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. नाईलाजस्तव भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या उमेदवारासाठी मते मागावी लागणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन कसे घडवून आणावे, हा प्रश्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे.

व्हीडिओ

२०१५ ला राज्यात युतीचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी दोन्हीकडच्या नेत्यांनी सोडली नाही. याच काळात भाजपने रामटेक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. जवळपास ९० हजार कार्यकर्त्यांची बांधणी केल्याचा भाजपचा दावा आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची सर्व तयारी भाजपकडून करण्यात आली होती.

पण, युतीची घोषणा झाली आणि ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. ही जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण, पक्षाच्या नेत्यांनी ही जागा शिवसेनेकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यात नाराजी पसरली आहे. ज्या शिवसेनेला इतके दिवस विरोध केला, त्यांचाच प्रचार कसा करावा? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. काँग्रेसने येथून मुकुल वासनीक यांना रिंगणात उतरवले आहे. तर , शिवसेना पुन्हा एकदा कृपाल तुमाणे यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details