महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP Woman Leader Murder case : भाजपा महिला हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली

BJP Woman Leader Murder case : भाजपाच्या नागपूर येथील महिला पदाधिकारी हत्या प्रकरणाचा गुंता वाढतच आहे. हत्येच्या ३० दिवसानंतरही महिलेचा मृतदेह मिळालेला नाही. त्यामुळे हत्येचं गूढ उलगडण्याऐवजी वाढतच आहे. प्रकरणात मुख्य आरोपीची नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी नागपूर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलेला अर्ज शुक्रवारी फेटाळला आहे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 12:43 PM IST

Nagpur Murder case
नागपूर महिला हत्या प्रकरण

नागपूर : BJP Woman Leader Murder case : आरोपीने महिलेची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, गेल्या एक महिन्यापासून महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीची नार्को चाचणी (Accused Narco Test ) करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. परंतु, दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाचा हा निर्णय नागपूर पोलिसांसाठी धक्का मानला जात आहे.

माहिती देणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस : नागपूर भाजपा महिला हत्या प्रकरणात (Nagpur women Murder case) नागपूर शहर पोलिसांचे सर्वच प्रयत्न आता अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पोलिसांनी महिला हत्या प्रकरणाबाबत माहिती देणाऱ्यासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. गेल्या महिनाभरापासून महिला बेपत्ता आहे. या दरम्यान महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली असली तरी, अद्याप महिलेचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

महिलेच्या मोबाईलमध्ये दडले राज : भाजपा महिला हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना अद्यापही पाहिजे तसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता नागपूर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास सुरू केला आहे. महिलेची हत्या होऊन आता जवळजवळ ३० दिवसांचा कालावधी उलटला आहे. महिलेचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. तिच्या मोबाईलमध्ये खूप काही दडलं असावं म्हणून आरोपीने महिलेचा मोबाईल नष्ट केल्याचा दाट संशय नागपूर पोलिसांना आहे.

गुगलची मदत ठरू शकते महत्वाची : हत्या प्रकरणात मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. म्हणून नागपूर पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलकडे मदत मागितली. महिलेच्या मोबाईलमध्ये अनेक राज, रहस्य दडलेले असू शकतात. अनेक चेहरे देखील पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी महिलेच्या मोबाईल डेटावरच लक्ष केंद्रित केले आहे.

आमदाराची झाली चौकशी : या प्रकरणात नागपुर पोलिसांनी मध्यप्रदेशातील तेंदुखेडाचे काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांची २४ ऑगस्ट रोजी सलग तीन तास चौकशी केली होती. चौकशी दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपीला आमदार संजय शर्मा यांच्यासमोर बसवून चौकशी करण्यात आली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने संजय शर्मा यांच्यासोबत संपर्क केला होता. त्यानंतर संजय शर्मा यांनी आरोपीला मदत केल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे. तीन तासांच्या चौकशीनंतर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया संजय शर्मा यांनी दिली.


हेही वाचा -

  1. Nagpur Murder case : महिला हत्या प्रकरणात आरोपीसह काँग्रेस आमदार संजय शर्माची समोरासमोर चौकशी सुरू
  2. Murder Case : नागपूर महिला हत्या प्रकरण; मध्यप्रदेशातील आमदाराची होणार चौकशी
  3. Nagpur Murder case : महिला हत्या प्रकरणात आरोपी करत आहे दिशाभूल; पोलिसांनी मागितली नार्को चाचणीची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details