महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंटावार दाम्पत्याला आयुक्त तुकाराम मुंढे पाठीशी घालत आहेत, भाजप नगरसेवकाचा आरोप - डॉ. शिलु गंटावार नागपूर बातमी

नागपूर महारानगरपालिकेच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शिलु गंटावार यांना काही दिवसापूर्वीच महापौरांनी निलंबित केले होते. परंतु महारानगरपालिका आयुक्तांकडून याबाबत अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. गंटावार यांना महानगरपालिका आयुक्तांकडून पाठराखण केल्याचा आरोप भाजपचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला आहे.

 गंटावार दाम्पत्याला आयुक्त तुकाराम मुंढे पाठीशी घालत आहेत
गंटावार दाम्पत्याला आयुक्त तुकाराम मुंढे पाठीशी घालत आहेत

By

Published : Jul 2, 2020, 9:41 PM IST

नागपूर : महापौरांनी निलंबित केलेल्या नागपूर महानगरपालिका वैद्यकिय अधिकारी डॉ. शिलु गंटावार यांना आयुक्त तुकाराम मुंढेंकडून पाठराखण होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जेष्ठ नेते नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. तर, गंटावार दाम्पत्याविरुद्ध सर्व पुरावे सादर केल्यानंतर सुद्धा आयुक्त कार्यवाही करत नसल्याने तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नागपूर महानगरपलिका वैद्यकिय अधिकारी डॉ. शिलु गंटावार यांना महानगरपालिका आयुक्तांकडून पाठराखण केल्याचा आरोप भाजपचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत डॉ. शिलु गंटावार यांना महारानगर पालिका आयुक्तांनी निलंबित का केले नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच शासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे राजकीय हस्तक्षेप असणे कायद्यानुसार चुकीचे असतांना डॉ. शिलु गंटावार ह्या काँग्रेसमध्ये विविध पद भूषवित आहेत. ह्या बाबी आयुक्तांना माहीत असूनही तुकाराम मुंढे गप्प का, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.

नागपूर महारानगरपालिकेच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शिलु गंटावार यांना काही दिवसापूर्वीच महापौरांनी निलंबित केले होते. परंतु महारानगरपालिका आयुक्तांकडून अजूनही कुठलीच कार्यवाही का करण्यात आली नाही. अशा अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे असे कायद्यात असतांना देखील तुकाराम मुंढे यांनी कोणतीही कार्यवाही का केली नाही, याचा अर्थ दोघांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत आयुक्तांना यासंबंधी विचारणा करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी सत्ता पक्षनेता संदिप जाधव उपस्थित होते. नियमानुसार शासकिय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खाजगी रुग्णालय असणे चुकीचे असताना डॉ. गंटावार विविध शहरांमध्ये स्वतःचे रुग्णालय चालवतात. त्यामुळे महारानगरपालिकेच्या रुग्णालयात उपस्थिती नसतांनाही त्यांची हजेरी कशी ग्राह्य धरल्या जाते, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details