महाराष्ट्र

maharashtra

कोरोना कमी होताच कामगारांना कामावरून काढले, 'बदलाव' संघटनेचे आंदोलन

By

Published : Aug 17, 2021, 6:48 AM IST

नागपुरात कोरोनाचा प्रकोप कमी होताच 1200 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मनपाने पूर्व सूचना न देताच कामावरून काढून टाकले. त्यामुळे संविधान चौकात 'बदलाव' संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

नागपूर
नागपूर

नागपूर - नागपुरात कोरोनाचा प्रकोप कमी होताच 1200 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मनपाने पूर्व सूचना न देताच कामावरून काढून टाकले. मनपा प्रशासनाला मागणी करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे काल (16 ऑगस्ट) संविधान चौकात 'बदलाव' या संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती द्यावी, तसेच दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर जम्बो कोविडसह अन्य आरोग्य सुविधा सक्षम करण्याची मागणी करण्यात आली.

'बदलाव' संघटनेचे आंदोलन

संघटनेचा इशारा

या आंदोलनात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काढून टाकण्यात आलेले कंत्राटी आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. यापुढेही धरणे देऊन हे आंदोलन चालू राहील, असा इशारा बदलाव संघटनेचे अध्यक्ष यश गौरखेडे म्हणाले.

संघटनेच्या मागण्या

  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन जम्बो कोविड हॉस्पिटल उभारावे.
  • बेडची संख्या वाढवावी.
  • आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान 11 महिन्यांसाठी नियुक्त करावे.
  • कोरोना काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना दरमहा 25 हजार ते 45 हजार रुपये वेतन देऊ असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र रुपये 6 ते 20 हजार रुपये देण्यात आले.
  • महामारीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेत भविष्यातील नोकरीच्या रिक्त पदांसाठी प्राधान्य द्यावे.

हेही वाचा -धक्कादायक! नाशिकमधील प्रांताधिकाऱ्याची नियत घसरली, तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details