नागपूर- भगतसिंगविरुद्ध साक्ष देणारी व्यक्ती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित होती. अशा आशयाची फेसबुक पोस्ट चंद्रपूर येथील बळीराजा धोटे यांनी केली. ही फेसबुक पोस्ट अगदी साधी आणि सरळ होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे अत्यंत चुकीचे असून देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिले नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.
संघाबाबत फेसबुक पोस्ट टाकणाऱ्यास अटक, ..मग देशात स्वातंत्र्य कुठे? माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील
चंद्रपूर येथील बळीराजा धोटे यांनी आरएसएस सबंधी फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिले नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.
ते मारले गेले.. माझीही शेवटची भेट असू शकते-
बळीराज धोटेंना पोलिसांनी आतंकवादी म्हणून घोषित केले नाही, हे त्यांचे नशीब. परंतु इतिहासातील सामान्य पोस्टही टाकली तरी गुन्हे दाखल होत आहेत. मग या देशात कोण स्वातंत्र्य आहे, असा सवाल कोळसे पाटील यांनी केला आहे. तसेच ३७० कलम बद्दलची सरकारची भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले. सैन्य लावून हिटलर देखील लोकशाही पुढे जिंकला नव्हता. तर मोदी काय काश्मीर लोकांची मन जिंकतील. सैन्य लावून लोकांना बंदिस्त ठेवणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये माझ्या सोबत जे होते, ते मारले गेलेत. त्यामुळे ही माझी शेवटची भेट असू शकते असेही ते म्हणाले.