महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर गडकरींचे वरदहस्त - अतुल लोंढे

नागपूर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता कामदार यांची शैक्षणिक अर्हता केवळ एमबीबीएस आहे. परंतु, त्यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वरदहस्त असल्यामुळेच त्यांना एवढ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर गडकरींचे वरदहस्त

By

Published : Aug 22, 2019, 10:11 AM IST

नागपूर- महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता कामदार यांची शैक्षणिक अर्हता आणि अनुभव हे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या डॉक्टर्सपेक्षा कमी आहे. तरीही डॉ. कामदार या फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘खास’ मर्जीतील असल्यामुळे त्यांना एवढ्या महत्वाच्या पदावर नियुक्ती देण्यात आली, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर गडकरींचे वरदहस्त असल्याचा अतुल लोंढे यांचा आरोप

ते म्हणाले, डॉ. सरिता कामदार यांची शैक्षणिक अर्हता फक्त एमबीबीएस आहे. तर त्यांच्या हाताखाली काम करणारे डॉक्टर्स हे ज्येष्ठतेत त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत. तसेच ते एमएस,एमसीएम, एमडी यासारखी पदव्युत्तर पदवीप्राप्त आहेत. मात्र, तरीही डॉ. कामदार यांच्यावर नितीन गडकरींचे वरदहस्त असल्यामुळे त्यांची वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. तसेच डॉ. कामदार, गडकरींच्या नावाचा वापर करुन सर्व कर्मचाऱ्यांना धाकात ठेवल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

नागपूरची आरोग्यसेवा रुग्णशय्येवर असून सर्वच शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. तसेच डॉक्टरांची कमतरता आहे. रुग्णाला उपचारासाठी औषध नाही आणि उपचार करणार डॉक्टरसुद्धा नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, वेळेत यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर प्रदेश काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा पवित्रा अतुल लोंढे यांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details