नागपूर Assembly Winter Session 2023 : आरोग्य विभागात खूप मोठे घोटाळे सुरू आहेत. हिवाळी अधिवेशनात आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार समोर आणणार असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे अनेक घोटाळे आहेत. आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झाले आहेत, ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये मांडू,असं देखील ते नागपुरात दीक्षाभूमी इथं बोलताना म्हणाले.
आरोग्य विभागातील घोटाळे बाहेर काढू : "आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार उघड करणार" अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. मंत्री तानाजी सावंत यांचे अनेक घोटाळे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगतिलं.
बाबासाहेब आंबेडकरांमुळे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार :"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा सर्व भारतीयांना दिला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनीच देशाला दिलंय, त्यामुळंच देशातील लोकशाही चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकणार आहे" अशा भावना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. संविधानरुपी ग्रंथाची जोपासना करू, टिकवू आणि रक्षण करू हीच खरी श्रद्धांजली आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महामानवाला ठरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तिघं मिळून तिजोरीची करत आहेत लूट :आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू असं ते म्हणाले आहेत. चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू नका,असंदेखील ते म्हणाले. "तिघं मिळून तिजोरीची लूट करत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. पैशांशिवाय मंत्री कामच करत नाहीत, 20 टक्के पेक्षा जास्त कमिशन घेणारं राज्य महाराष्ट्र झालं आहे", असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.