नागपूर - जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थीनीवर आश्रम शाळेच्या शिपायाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी आरोपी शिपाई अशोक चरडे विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
13 वर्षीय विद्यार्थिनीवर आश्रम शाळेच्या शिपायाकडून अत्याचार, नागपूर जिल्ह्यातील घटना - नरखेड
आश्रम शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर जेव्हा पीडिता घरी गेली तेव्हा तिने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी नरखेड पोलीस ठाणे गाठून आरोपी अशोक चरपे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी नरखेड तालुक्याच्या बेलोणा येथील मातोश्री सुमनताई आश्रम शाळेत शिक्षण घेते. ही घटना अडीच महिन्यांपूर्वी घडली. ज्यावेळी पीडिता सुट्ट्या संपल्यानंतर आश्रम शाळेत परतली तेव्हा केवळ तीनच विद्यार्थिनी शाळेत पोहचल्या होत्या. विद्यार्थिनींची संख्या कमी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी अशोक चरपे याने पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार केला. मात्र, त्यावेळी आरोपीने दिलेल्या धमकीच्या भीतीपोटी ती गप्प राहिली होती.