नागपूर- उमरेड तालुक्यातील कुहीच्या विविध भागात पूरग्रस्तांचा मदतीसाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जवानांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या आणि बेघर झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
उमरेड तालुक्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्याचे जवान तैनात - नागपूर जिल्हा बातमी
उमरेड तालुक्यातील विविध भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्याचे दोन पथक तैनात करण्यात आला आहे. जवानांकडून पुरात अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
उमरेड तालुक्यातील कुही या पूरग्रस्त भागातील स्थानिकांना मदत करण्याची विनंती नागरी प्रशासनाने केली होती. म्हणून उमंग उप-क्षेत्राने बचाव आणि मदत कार्यांसाठी रात्रीत दोन पथके तैनात केले आहेत. मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे चौराई धरणाचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये पूर आलेला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराचा परिणाम झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ते सध्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील जलयुक्त भागात अडकलेल्या स्थानिक ग्रामस्थांना वाचविण्यात मदत करत आहेत.
हेी वाचा -नागपूर पूर: राज्य शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी