नागपूर - देशातील प्रत्येक नागरिकाने युरिन साठवल्यास त्यापासून युरिया तयार केला जाऊ शकतो, त्यामुळे देशाचे चाळीस हजार कोटी रुपये वाचतील, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
प्रत्येकाने युरिन साठवल्यास देशाचे चाळीस हजार कोटी वाचतील - नितीन गडकरी
लोक माझ्यावर हसायचे, पण जेव्हा ही कल्पना सत्यात उतरायला लागल्यावर मात्र अनेकांना यावर विश्वासच बसला नव्हता, असे देखील गडकरी म्हणाले. देशात साखर, डाळ, तांदूळ यासारखे धान्य अतिरिक्त असल्याने शेत मालाला भाव मिळत नाही. सरकार कुणाचेही आले तरी परिस्थिती बदलणार नाही,
नवनवीन कल्पनासाठी आणि इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा युरिनपासून युरियाची संकल्पना मांडली आहे. ज्यावेळी युरिनपासून युरिया तयार करण्याची संकल्पना मांडली, त्यावेळी लोक माझ्यावर हसायचे, पण जेव्हा ही कल्पना सत्यात उतरायला लागल्यावर मात्र अनेकांना यावर विश्वासच बसला नव्हता, असे देखील गडकरी म्हणाले. देशात साखर, डाळ, तांदूळ यासारखे धान्य अतिरिक्त असल्याने शेत मालाला भाव मिळत नाही. सरकार कुणाचेही आले तरी परिस्थिती बदलणार नाही, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पादन घेण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.