महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया २० राज्यात २०० उमेदवार उतरवणार रिंगणात'

आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीरनामा प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आला आहे. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया २० राज्यात २०० उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी दिली.

राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर

By

Published : Mar 19, 2019, 2:05 PM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीरनामा प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आला आहे. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया २० राज्यात २०० उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली.

राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू व्हायची असली, तरी नागपुरातील अनेक छोटे-मोठे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागली आहेत. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया तर्फे २० राज्यातील २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यापैकी राज्यातील ३० उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केली आहे.


एवढेच नाही तर ५ खासदार निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील आदिवासी भागातून एक खासदार निवडून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. देशाची अर्थव्यवस्था बुडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान असल्याचा आरोपही मानकर यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details