नागपूर -नियमानुसारच गायरान जमीन वाटप केल्याचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी विधानसभेत दावा केला आहे. (Abdul Sattar In Assembly) यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनीही आदेश दिल्याची सत्तार यांनी माहिती दिली. (Abdul Sattar allegations) विरोधकांनी जमिनी हडप केल्याचा आरोप यावेळी केला. न्यायालय या प्रकरणात जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही, सत्तार यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Assembly Session) जमिनीचा ताबा मिळावा म्हणून योगेश खंडारे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
सरकारी गायरान जमीन हडपण्याचा त्याचा इरादा - मौजे घोडबाभूळ (जिल्हा वाशीम) येथील सरकारी गायरान जमीन गट नं. ४४ मधील ३७ एकर १९ गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा दीडशे कोटीचा आहे. गायरान जमीनी कुणाला देता येत नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण करत आलो आहोत असे, असताना योगेश खंडारे यांनी जिल्हा न्यायालयात मागणी केली होती. त्यांची ती मागणी फेटाळून लावली आहे. जिल्हा न्यायालयाने योगेश खंडारे यांचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना, तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी गायरान जमीन हडपण्याचा त्याचा इरादा होता असे निरीक्षण कोर्टाने नोंदवल्याचेही अजित पवार म्हणले आहेत.
खंडपीठाने आपले गंभीर निरीक्षण नोंदवले - तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला होता. तसेच, राज्य सरकारचा जो आदेश होता याची संपूर्ण माहिती अब्दुल सत्तार यांना होती. दरम्यान, जून महिन्यात ठाकरे सरकार जाणार अशी परिस्थिती असताना १७ जून २०२२ ला ३७ एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने आपले गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी निर्णय घेतला असेही अजित पवार म्हणाले आहेत.