नागपूर - महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर धावणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते आज नागपूर येथे पहिल्या सीएनजी बसच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. येथे महानगर पालिकेच्या डिझेल बसला सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे.
महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर करणार - नितीन गडकरी
प्रदूषण कमी करायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांना विकसित करून रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करावी लागेल. यासाठी शासकीय वाहनांना डिझेलवरून सीएनजीमध्ये परिवर्तीत करणे हादेखील एक उपाय आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने प्रवासी बस डिझेलवरून सीएनजीमध्ये परावर्तीत केली आहे.
ज्या वेगाने नागपूर शहराचा विकास आणि विस्तार होतो आहे, त्यामुळे शहरातील वाहनांची संख्यादेखील त्याच गतीने वाढताना दिसत आहे. नागपुरात वाहनांची संख्या एवढी वाढली आहे, की नागपूरकरांकडे मध्य भारतातील सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे प्रदूषणाचा स्तर प्रचंड उंचावला आहे. प्रदूषण कमी करायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांना विकसित करून रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करावी लागेल. याचसोबत शासकीय वाहनांना डिझेलवरून सीएनजीमध्ये परिवर्तीत करणे हादेखील एक उपाय आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने प्रवासी बस डिझेलवरून सीएनजीमध्ये परावर्तीत केली आहे.
नागपूर महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर चालवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या ५० डिझेल बस सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार आहे. वर्षभराच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.