नागपूर- आज महाराष्ट्र दिन आहे. या दिवशीही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच विदर्भवादी एकत्र येऊन संविधान चौकातून बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी श्रीहरी आणे देखील उपस्थित होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनी 'काळा दिवस' - state
वेगळ्या विदर्भाच्या झेंड्याचेही यावेळी अनावरण करण्यात आले आहे. तसेच आज दिवसभर नागपूरसह विदर्भात निषेध म्हणून विविध आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरंग अणे यांनी दिली.
वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनी 'काळा दिवस'
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज विदर्भामध्ये अनेक ठिकाणी काळा दिवस साजरा केला जात आहे. जेव्हापासून विदर्भाचे अस्तित्व नष्ट झाले आणि महाराष्ट्र निर्माण झाला त्या दिवसाचा आम्ही वर्षानुवर्ष निषेध करत असल्याचे श्रीहरी आणे यांनी यावेळी सांगितले. तसेच वेगळ्या विदर्भाच्या झेंड्याचेही यावेळी ध्वजारोहन करण्यात आले आहे. तसेच आज दिवसभर नागपूरसह विदर्भात निषेध म्हणून विविध आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरंग आणे यांनी दिली.
Last Updated : May 1, 2019, 10:27 AM IST