महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#covid 19: बंद दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 348 जणांवर कारवाई... - कोरोना अपडेट नागपूर

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 4 महानगरात लॉकडाऊन केल्यानंतर शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनावश्यक कामांकरिता रस्त्यावर फिरणाऱ्या 348 नागरिकांवर ताब्यात घेण्यात आले होते. त्या सर्वांना 4 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर तंबी देऊन सोडून देण्यात आले आहे.

action-against-348-people-during-shutdown-in-nagpur
बंद दरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 348 जणांवर कारवाई...

By

Published : Mar 21, 2020, 8:29 PM IST

नागपूर- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शनिवार पासून नागपूर शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आवश्यक नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडून नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 4 महानगरात लॉकडाऊन केल्यानंतर शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

हेही वाचा-दिवसभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडींचा वेगवान आढावा...

दरम्यान, अनावश्यक कामांकरिता रस्त्यावर फिरणाऱ्या 348 नागरिकांवर ताब्यात घेण्यात आले होते. त्या सर्वांना 4 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर तंबी देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details