नागपूर- कुख्यात तडीपार गुंड सैयद मोबीन अहमद याने पोलीस व्हॅनमध्ये बसून टिकटॉक व्हिडिओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात उभ्या असलेल्या वाहनात हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, अशा प्रकारे शासकीय वाहनाचा दुरुपयोग करनाऱ्या या तडीपार गुंडाच्या मुसक्या आवळण्यास यशोधरा पोलिसांना यश आले आहे
पोलीस 'व्हॅन'मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनविणारा तडीपार गुंड जेरबंद - सोशल मीडिया
वाहनचोरी आणि जनावरांची तस्करी करणाच्या आरोपात जामिनावर असलेल्या मोबीनला महिन्याभरापूर्वी तडीपार घोषित करण्यात आले होते. तडीपार असताना सैय्यदने पोलीस व्हॅनमध्ये टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता
कुख्यात तडीपार गुंड सैयद मोबीन अहमद
वाहनचोरी आणि जनावरांची तस्करी करणाच्या आरोपात जामिनावर असलेल्या मोबीनला महिन्याभरापूर्वी तडीपार घोषित करण्यात आले होते. तडीपार असताना सैय्यदने पोलीस व्हॅनमध्ये टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये कोलार गोल्ड फील्ड फिल्ममधील प्रसिद्ध डायलॉग..गँग लेकर आने वाले होते है गँगस्टर.. और अकेले आता है मॉन्सटर, असा आशय होता. हा व्हिडिओ शूट करुन त्याने सोशल मीडियावर अपलोड केला होता. मात्र, पोलिसांनी आता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.