नागपूर -चॉकलेटचे आमिष दाखवून एका नाराधमाने दोन अल्पवयीन मुलींचे सलग दोन दिवस लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा गावात घडली आहे. पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास कन्हान पोलिसांनी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी दिली.
कन्हान येथील दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला अटक - kanhan police station
चॉकलेटचे आमिष दाखवून एका नाराधमाने दोन अल्पवयीन मुलींचे सलग दोन दिवस लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा गावात घडली आहे. पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीला अटक केली.
कन्हान येथील दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला अटक
आरोपी तुलसीराम शामराव कारेमोरे हा कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालवा गावात राहतो. त्याच गावात राहणाऱ्या दोन चिमुकल्या त्यांचे वय अनुक्रमे सात आणि आठ असे असून त्यांच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित चिमुकल्यांनी घडलेला सर्व प्रकार घरच्यांसमोर कथन केल्यानंतर घटनेची तक्रार कन्हान पोलीस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारी वरून आरोपीला अटक केली आहे.
Last Updated : May 13, 2020, 7:40 PM IST