महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवर अनोळखी व्यक्तींना मित्र बनवत असाल तर सावधान...तुमची एक चूक आयुष्य उद्धवस्त करू शकते - आरोपी

मागील सहा महिन्यापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. आरोपी पीडित मुलीशी संवाद साधण्यासाठी इतर टेलिफोन एक्सचेंजच्या वापर करायचा. तसेच फोन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सर्व्हरचा वापर करत होता. त्यामुळे मुख्य आरोपीचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता. मात्र, नागपूर पोलिसांनी अत्यंत क्लिष्ठ प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यावेळी आरोपीने त्या तरुणीचा व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करताना एक चूक केली. आरोपीने तो व्हिडिओ अक्षय नावाच्या आपल्या मित्राला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.

नागपूर

By

Published : Aug 14, 2019, 2:27 PM IST

नागपूर- तुम्ही फेसबूक वापरत असला आणि करिअरच्या शोधात असताना फेसबूकच्या माध्यमातून एखाद्या अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आले असाल तर ही बातमी आवर्जून वाचा... एका तरुणाने अँड्रू अँडरसन नावाने फेक अकाउंट बनवून नागपूरच्या एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. ऑडिशनच्या नावावर पीडित तरुणीचे आपत्तीजनक व्हिडिओ मागवले व ते व्हिडिओ पुढे पॉर्न साईटवर अपलोड करण्याची भीती दाखवून खंडणी मागितली. गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय सर्व्हरचा वापर करताना देखील नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक करून मोठा सायबर गुन्हा उघडकीस आणला आहे.

फेसबूकवर अनोळखी व्यक्तींना मित्र बनवत असाल तर सावधान...तुमची एक चूक आयुष्य उद्धवस्त करू शकते

अँड्रू अँडरसन नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट चालवणारा गुन्हेगार सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या अँड्रू अँडरसनचे खरे नाव फिरोज अन्सारी आहे. तो नोकरी निमित्ताने कुवेतमध्ये राहतो. त्याने नागपूर येथे राहणाऱ्या एका तरुणीला स्वीडन येथे राहत असल्याचे सांगून तिला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. आरोपीने सुरुवातीला त्या मुलीचे फोटो मागितले. त्यानंतर आरोपीने ऑडिशनच्या नावावर पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ मागितले. कालांतराने रोज दोन व्हिडिओ पाठवण्याची मागणी करू लागला. व्हिडिओ पाठवले नाही तर ते व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करण्याची भीती दाखवून पाच लाखाची खंडणी मागितली.

मागील सहा महिन्यापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. आरोपी पीडित मुलीशी संवाद साधण्यासाठी इतर टेलिफोन एक्सचेंजच्या वापर करायचा. तसेच फोन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सर्व्हरचा वापर करत होता. त्यामुळे मुख्य आरोपीचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता. मात्र, नागपूर पोलिसांनी अत्यंत क्लिष्ठ प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यावेळी आरोपीने त्या तरुणीचा व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करताना एक चूक केली. आरोपीने तो व्हिडिओ अक्षय नावाच्या आपल्या मित्राला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.

आरोपीच्या मित्राला अटक झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या एजन्सींच्या संपर्कात राहून आरोपी फिरोज अन्सारी दिल्ली विमानतळावर उतरताच इमिग्रेशनच्या मदतीने त्याला अटक केली. याआधी पोलिसांनी आरोपीच्या शोधात आठ राज्यांचे अनेक जिल्हे पालथे घातले. चार हजार किलोमीटर प्रवास केला, एवढंच नाही तर शेकडोंची चौकशी केली. त्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असल्याने नागपूर पोलिसांचे कौतूक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details