नागपूर- जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. त्यावर चांगले आणि वाईट पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले. कलम 370 रद्द केल्याने लडाख आणि जम्मूच्या काही भागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काश्मीरच्या लोकांमध्ये नाराजी आहे. तसेच पाकिस्तानकडूनही कलम 370 रद्द करण्याला वारंवार विरोध केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती माजी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली आहे.
स्लीपर सेल घातपात करण्याची शक्यता, पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज - अभय पटवर्धन
पाकिस्तानकडून घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती माजी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली आहे.
अभय पटवर्धन
जम्मू आणि काश्मीर भागात 32 हजार सैन्य असून यामध्ये सीआरपीएफ आणि बीएसएफचे जवान तैनात असल्याने तिथे कडेकोट सुरक्षा आहे. मात्र, संपूर्ण देशभरात स्लीपर सेल पसरले असून त्यांचाकडून उद्रेक करण्याचे प्रयत्न दहशतवादी करतील. त्याकसाठी गुप्तचर विभाग आणि मोठया शहरातील स्थानिक पोलिसांना सतर्क रहाण्याची गरज आहे, अशी माहिती अभय पटवर्धन यांनी दिली.