नागपूर -शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव झिलपी तलावात दोघांचा पोहताना बुडल्याने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अब्दुल असिफ शेख (३५) आणि शहबील अब्दुल असिफ (१२) या दोघांचा समावेश आहे. ते नात्याने बाप-लेक असल्याची माहिती पुढे आली आहे. हिंगणा पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेहांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.
नागपूरमध्ये वाढदिवस साजरा करायला गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू - अब्दुल असिफ शेखचा तलावात बुडून मृत्यू नागपूर
नागपूरमध्ये वाढदिवस साजरा करायला गेलेल्या बाप-लेकावर काळाने घाला घातला आहे. मोहगाव झिलपी तलावात पोहताना बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अब्दुल असिफ शेख (३५) आणि शहबील अब्दुल असिफ (१२) अशी त्या दोघांची नावे आहेत.
नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिपू सुलतान चौक येथील निवासी अब्दुल असिफ शेख हे आज (17 मे) सकाळी कुटुंबाला घेऊन हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव झिलपी येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. पती, पत्नी आणि दोन मुले असे चौघे तलावाजवळ गेले होते. अब्दुल असिफ शेख यांच्या एका मुलाचा आज वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. गाळात अडकल्याने ते पाण्यात बुडाले, हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली. तलावावर उपस्थित असलेल्या काहीजणांना हे दृश्य दिसले. यामुळे पत्नीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र अब्दुल आणि शहबील या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
हेही वाचा -नाशिक : कोरोनामुळे 10 दिवसात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू