नागपूर :Aaditya Thackeray: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नागपूर येथील मेडिकल कॉलेजला भेट देत आरोग्य व्यवस्थाची माहिती जाणून घेतली. त्यांनी आज राज्यातील तीन वेगवेगळ्या शहरात भेटी दिल्या. काही शहरात औषध आणि वाढत्या मृत्यूची चर्चा झाली. मात्र, यावर मला राजकारण न करता मार्ग काढणं महत्वाचं आहे. याच यंत्रणेच्या कामाचं कोव्हिडं काळात कौतुक झालं मात्र, सध्या कुठे आणि काय चुकत आहे याची माहिती घ्यायला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) व खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) उपस्थित होते.
आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे: राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आजही अनेक पद रिक्त आहेत. याकडे सरकार कधी लक्ष देईल (Aditya Thackeray Criticizes State Government) असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईत देखील आवश्यक औषधांची कमतरता आहे. पावसाळ्यात दरम्यान अनेक आजार डोकं वर काढतात, त्यावेळी बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण येतात. त्यांना आरोग्य सेवा दिली जाती मात्र, त्याला सरकारची मदत मिळाली पाहिजे. ही व्यवस्था करण्यात आरोग्य खात कमी पडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आम्ही या विषयावर आंदोलन करू शकलो असतो पण आम्ही तर नेमकी परिस्थिती जाणून घेत आहोत. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मागणीच्या तुलनेत औषध पुरवठा होत नाही. सरकारने किमान हा बेसिक सपोर्ट रुग्णालयांना दिला पाहिजे.