महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून ८० लाखांची रोकड जप्त - जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये नाकेबंदी करायला सुरुवात झाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Mar 16, 2019, 1:34 PM IST

नागपूर - सावनेर तालुक्याच्या सिरोंजी चेक पोस्ट येथे सुरक्षा पथकाने वाहनांची तपासणी करताना २ गाड्यांमधून ८० लाखांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात दोन्ही गाड्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम पुढील तपासाकरिता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये नाकेबंदी करायला सुरुवात झाली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या सावनेर विधानसभा मतदार संघातील सीरोंजी चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २ चारचाकी गाड्यांमधून ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मध्यप्रदेश आरटीओ चेक पोस्ट सातनूर केळवद येथे तपासणी पथक वाहनांची तपासणी करत असताना २ चारचाकी गाड्यांची (क्रमांक एम एच ४९ व्हीबी ०८०१, एम एच ३१ एजी ६९६१) झडती घेण्यात आली. त्यातील एका गाडीत ३० लाख तर, दुसरीत ५० लाख रुपये आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा पंचनामा करून ही रक्कम पुढील चौकशीकरिता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ही रक्कम कुणी कशासाठी नागपूरला पाठवली होती याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details