महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : पुरात अडकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला प्लास्टीक टबच्या सहाय्याने वाचवले, व्हिडिओ व्हायरल - नागपूर कन्हान पूर

मध्यप्रदेशातील चौराई धरणामधून पाणी सोडल्याने कन्हान, वैनगंगा नदीला पूर आला आहे. याचा फटका नागपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून आंभोरा देवस्थान देखील पुराच्या पाण्याखाली गेले आहे. तसेच हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

nagpur latest news  nagpur kanhan flood situation  nagpur kanhan flood news  नागपूर कन्हान पूरपरिस्थिती  नागपूर कन्हान पूर  nagpur 8 months old daughter rescue
VIDEO : पुरात अडकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला प्लास्टीक टबच्या सहाय्याने वाचवले, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Sep 1, 2020, 12:25 PM IST

नागपूर -जिल्ह्यातील कन्हान नदीला पूर आल्यामुळे परिसरातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामधून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यातच एका आठ महिन्याच्या चिमुकलीला प्लास्टीकच्या टबच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही घटना नागपुरातील वाकीजवळील गोसेवाडी गावाजवळची आहे.

VIDEO : पुरात अडकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला प्लास्टीक टबच्या सहाय्याने वाचवले, व्हिडिओ व्हायरल
मुसळधार पावसामुळे तसेच धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कन्हान नदीची पाणीपातळी वाढली होती. गोसेवाडीजवळ इम्रान सिद्दीकी यांचे शेळीपालन केंद्र असून कन्हान नदीचे पाणी या शेळी पालन केंद्रात शिरले होते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या दोन कुटुंबांतील महिला आपल्या चिमुकल्यांसह गोटफॉर्मच्या छतावर चढल्या आणि तेथून इम्रान सिद्दीकी यांना फोन केला. सिद्दकी यांनी गावातील लोकांसोबत घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने या सर्वांना वाचविण्यात आले. पुराचे पाणी आठ महिन्याच्या चिमुकलीच्या नाकातोंडात जाण्याची भीती असल्यामुळे चिमुकलीला प्लास्टीकच्या टबमध्ये ठेवले. त्यानंतर एक माणूस दोरीच्या साहाय्याने हातात टब धरून पायी चालत बाहेर आला आणि चिमुकलीला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, मध्यप्रदेशातील चौराई धरणामधून पाणी सोडल्याने कन्हान, वैनगंगा नदीला पूर आला आहे. याचा फटका नागपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून आंभोरा देवस्थान देखील पुराच्या पाण्याखाली गेले आहे. तसेच हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details