नागपूर- शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील दोन आणि एसआरपीएफच्या एका जवानाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तिघांच्या संपर्कात आलेल्या 62 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नागपुरात कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कातील ६२ कर्मचारी विलगीकरणात - police got affected by corona in nagpur
क्वारंटाईन केलेल्या पोलिसांमध्ये एसआरपीएफचे 37 जवान तसेच तहसील पोलीस स्टेशनचे 5 कर्मचारी, नियंत्रण कक्षातील 12 आणि डीसीपी कार्यालयातील 8 जणांचा समावेश आहे.
क्वारंटाईन केलेल्या पोलिसांमध्ये एसआरपीएफचे 37 जवान तसेच तहसील पोलीस स्टेशनचे 5 कर्मचारी, नियंत्रण कक्षातील 12 आणि डीसीपी कार्यालयातील 8 जणांचा समावेश आहे.
शहरातील सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागाला कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या दोन्ही परिसरात तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. सुमारे दोन महिन्यात पोलिसांना लागण झाल्याची एकही घटना समोर आली नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील दोन आणि एसआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे.