महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह, सर्व मृत रुग्णाचे नातेवाईक - corona in maharashtra

5 एप्रिलला 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. याच रुग्णाच्या सहा नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 25 वर गेली आहे.

नागपुरात सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह
नागपुरात सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Apr 10, 2020, 9:47 AM IST

नागपूर- जिल्ह्यात आणखी सहा लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आले आहे. 5 एप्रिलला 68 वर्षीय वृद्धाचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. याच रुग्णाच्या सहा नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 25 वर गेली आहे.

4 एप्रिलला नागपुरच्या सतरंजीपुरा परिसरातील 68 वर्षीय व्यक्तीत कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण सतरंजीपुरा परिसर सील केला. रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना टेस्ट केली गेली. अहवाल प्राप्त होताच सहा नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

सर्व 6 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवीन सहा रुग्ण पुढे आल्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 25 वर पोहोचली आहे. यातील चार रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. इतर 20 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details