नागपूर- महारानगर पालिकेकडून ५ टक्के पाणी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाजप नगरसेवकांचा विरोध आहे. मात्र, हा निर्णय कायद्यानुसार घेतला गेला आहे. अशी प्रतिक्रिया आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. शिवाय जे पाणी दरवाढ रद्द करण्याची मागणी करत आहेत, ती मागणी निरर्थक असल्याचेही आयुक्त मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे, मुंढे विरुद्ध भाजप हा संघर्ष अधिक तिव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
पाणी दरवाढीवरून नागपूर महारानगरपालिकेत आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून पाणी दरवाढीला विरोध केला जात आहे. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनासमोर नगरसेवकांनी आंदोलन देखील केले. मात्र, पाणी दरवाढ हे कायद्यानुसारच आहे. त्यात बदल होणे शक्य नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. शिवाय पाणी दरवाढ रद्द करण्याची मागणी निरर्थक असल्याचेही मुंढे यांनी सांगितले. त्याचबरोबर, ५ टक्के दरवाढ करून महारानगर पालिकेला अधिक महसूल मिळणार आहे. या महसुलातून इतर कामे केली जातात, त्यामुळे हा निर्णय रद्द होणार नाही. असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.