महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कन्हान नदीत 5 तरुण बुडाले - Kanhan River Nagpur

कन्हान नदीत पाच तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. पाचही तरुण यवतमाळमधील दिग्रस येथील रहिवाशी आहेत. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पाच युवक बुडाले आहेत. या तरुणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

5 People Drown At Kanhan River Nagpur
नागपूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कन्हान नदीत 5 तरुण बुडाले

By

Published : Sep 5, 2021, 1:11 PM IST

Updated : Sep 5, 2021, 1:21 PM IST

नागपूर -जिल्ह्यातील कन्हान नदीत पाच तरुण बुडाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कन्हान येथील गाडेघाट येथे दर्शनासाठी आलेल्या काही तरुणांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, नदी पत्रात पाणी जास्त होते. तरुणांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते बुडल्याची घटना घडली आहे.

कन्हान नदीत पाच तरुण बुडाल्याची खळबळजनक घटना

कन्हान नदीत बुडालेले सर्व भविक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी आहेत. आज 13 भाविक दर्शनासाठी आले होते. त्यापैकी 5 जण नदीत बुडाले आहेत. घटनेची माहिती कळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेल्या सर्वांचे शोधकार्य सुरु केले असून अद्याप एकही जण सापडलेला नाही.

सय्यद अरबाज (21), ख्वाजा बेग वय (19), सप्तहीन शेख(20), अय्याज बेग (22) आणि मो आखुजर (21) अशी नदीत बुडालेल्या तरुणांचे नाव आहेत.

हेही वाचा -Teachers day : तंत्रज्ञानाच्या असुविधेनं गुरूजीच विद्यार्थ्यांसाठी सरसावले; स्वत: गावात जाऊन देतात धडे

Last Updated : Sep 5, 2021, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details