नागपूर- शहरातील २८० बिल्डर्स आणि व्यावसायिकांनी बँकांचे कर्ज बुडवल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका बिल्डरचा बंगला जप्त करण्यात आला असून आता इतर कर्जबुडवे जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत.
प्रसिद्ध बिल्डर दिपक निलावर यांनी बँकेचे चार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकवले आहे. त्यामुळे त्यांचा बंगला जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच शहरातील तब्बल २८० बिल्डर्स आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची मालमत्ता केव्हाही जप्त केली जाऊ शकत असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खंजाजी यांनी दिली.
नागपुरात बँकांचे कर्ज बुडवणारे मोठे थकाबाकीदार -
- थकबाकीदाररक्कमकर्ज दिलेली बँक
- गंगाधर राव ४४ कोटी बँक ऑफ इंडिया
- श्रीधर वैद्य ३४ कोटी कॉसमॉस बँक
- नरेंद्र सबनानी ३० कोटी स्टेट बँक ऑफ इंडिया
- प्रदिप अग्रवाल १० कोटी देना बँक
- कमल कोठारी १० कोटी कॉसमॉस बँक
- अप्पास्वामी इन्फ्रा ९ कोटी रेलीगर फिनवेस्ट लि.
- संजय कुकरेजा ९ कोटी बँक ऑफ इंडिया
- सत्यप्रभा सत्पथी ६ कोटी अलाहाबाद बँक
कर्जाचे सलग तीनपेक्षा जास्त ईएमआय भरले नाहीतर त्यांचे बँक खाते एनपीआय होत असते. त्यानंतर कर्ज देणारी बँक थकाबाकीदारांना ६० दिवसात थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावते. या काळात कर्ज न भरल्यास जिल्हा प्रशासनाच्या मदतीने थकाबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाते.